राज्य स्तरीय निबंध स्पर्धा 2026 | State Level Essay Competition 2026

आपण सर्वांच्या लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी, विचारांना व्यासपीठ देण्यासाठी आणि राज्यभरातील प्रतिभावान विद्यार्थी, युवक, पालक यांना संधी देण्यासाठी राज्य स्तरीय निबंध स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे.

🎯 स्पर्धेच्या Category

🟢 Category A – 5 वी ते 7 वी

विषय:
• माझ्या स्वप्नातील भारत
• पर्यावरण आणि माझी जबाबदारी

📏 शब्दमर्यादा – कमीत कमी 300 शब्द

🔵 Category B – 8 वी ते 10 वी

विषय:
• सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांवर प्रभाव
• आजचा युवक उद्याचा भारत

📏 शब्दमर्यादा – कमीत कमी 500 शब्द

🟣 Category C – 11 वी ते 12 वी

विषय:
• युवा शक्ती आणि विकसित भारत
• “भारत 2047” माझे स्वप्न

📏 शब्दमर्यादा – कमीत कमी 700 शब्द

🟠 Category D – Open Category (12th+)

विषय:
• आजच्या भारतात युवकांची भूमिका
• आजचा समाज आणि सोशल मीडियाचा प्रभाव

📏 शब्दमर्यादा – कमीत कमी 900

🏅 बक्षीस रचना (प्रत्येक Category साठी स्वतंत्र)

📜 सर्व सहभागींसाठी Participation Certificate

🥇 प्रथम क्रमांक – Trophy + Medal + Certificate + Book Set
🥈 द्वितीय क्रमांक – Trophy + Medal + Certificate
🥉 तृतीय क्रमांक – Trophy + Medal + Certificate

⭐ Top 20 Merit Certificates
📜 टीप – शाळेच्या विद्यार्थ्याच्या प्रम्नापात्रावर विध्यार्थ्याचे आणि शाळेचे नाव असेल

💰 Entry Fee

₹299 Only

📌 नोंदणी सुरू : 01 जुन 2026
📌 नोंदणीची अंतिम तारीख : 31 ऑगष्ट 2026 08 सप्टेंबर 2026 (सूचना – काही सहभागींना टेक्निकल error मुळे नोंदणी करता आली नाही त्यामुळे हि तारीख चर्चेअंती वाढविण्यात आली आहे)
📌 निकाल जाहीर : 30 सप्टेंबर 2026
📌 बक्षीस वितरण समारंभ : ऑक्टोबर 2026

🌐 नोंदणी व सबमिट लिंक: Click Here

📝 निबंध सबमिट करण्याचे नियम

✅ निबंध मराठी / हिंदी / English भाषेत चालेल
✅ निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून scan/photo करून किंवा Type करून सबमिट करू शकता
✅ File Format: PDF / JPG / JPEG / PNG
✅ Max File Size: 10 MB
✅ फक्त एकच File Upload करावी
✅ File स्पष्ट व वाचनीय असावी

📏 शब्दमर्यादा

🟢 Category A – कमीत कमी 300 शब्द
🔵 Category B –  कमीत कमी 500
🟣 Category C – कमीत कमी 700 शब्द
🟠 Category D – कमीत कमी 900 शब्द

⚠️ महत्त्वाच्या अटी

❌ Copy केलेला / AI generated / इंटरनेटवरून घेतलेला निबंध चालणार नाही
❌ एकाच व्यक्तीने अनेक Category मध्ये सहभाग घेऊ नये
❌ निर्णय समितीचा निर्णय अंतिम राहील
❌ चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो

 

📢 आजच नोंदणी करा!

तुमच्या विचारांना शब्द द्या, लेखन कौशल्य दाखवा आणि राज्यस्तरीय सन्मान मिळवा.

👉 नोंदणी व निबंध सबमिट करा: – Click Here

https://uddishta-foundation.com/essay-competition-2026/


📞 अधिक माहिती करिता संपर्क: 9284470842

Whats App Now – Click Here

शब्द

निबंधाची निवड कशी होईल?

प्रत्येक निबंधाचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून खालील 100 गुणांच्या निकषांनुसार केले जाईल.

मूल्यमापनाचा निकष
कमाल गुण
📝 विषयाशी सुसंगतता व अचूकता
25
💡 विचारांची मांडणी व सखोलता
25
मौलिकता व स्वतःचे विचार
20
📖 भाषाशैली, व्याकरण व शब्दसंपदा
15
🎯 तार्किक मांडणी, उदाहरणे व निष्कर्ष
10
एकूण प्रभाव व सादरीकरण
5
एकूण गुण
100
⚖️ निष्पक्ष व पारदर्शक परीक्षण

प्रत्येक Category मधील सहभागींच्या वयोगटाचा विचार करून निबंधाचे मूल्यमापन केले जाईल. आशय, विचारांची गुणवत्ता, मौलिकता, भाषाशैली आणि विषयाची प्रभावी मांडणी यांना प्राधान्य दिले जाईल. परीक्षकांचा निर्णय हा स्पर्धेच्या नियमांनुसार आणि वरील मूल्यांकन निकषांवर आधारित असेल.

Demo Results

स्पर्धेचे निकाल

आपल्या Category वर क्लिक करून संबंधित विजेते आणि Merit List पहा.

तज्ज्ञ परीक्षक मंडळ

स्पर्धेतील निबंधांचे निष्पक्ष व गुणवत्तापूर्ण परीक्षण करण्यासाठी आमचे मान्यवर परीक्षक मंडळ.

सौ. सविता दुधे

सौ. सविता दुधे

HR & Administration Professional | समुपदेशिका | वारली कला-साधिका | लेखिका | महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत
सौ. सविता दुधे या HR आणि Administration क्षेत्रातील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अनुभवी व्यावसायिक आहेत. मानवी संसाधन व्यवस्थापन, कर्मचारी संबंध, प्रशासन आणि संस्थात्मक कार्यपद्धती या क्षेत्रांत त्यांनी दीर्घकाळ काम केले असून, सध्या त्या ठाण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

व्यावसायिक क्षेत्रासोबतच मानवी मन आणि भावविश्व समजून घेण्याची त्यांची विशेष संवेदनशीलता आहे. समुपदेशिका म्हणून काम करताना त्यांनी विविध व्यक्तींच्या समस्या आणि भावनिक गरजा समजून घेतल्या आहेत. सकारात्मक विचारसरणी, भावनिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य याबाबतही त्या सातत्याने कार्यरत आहेत.

कलेच्या क्षेत्रात ‘स्वामिनी वारली आर्ट’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्या वारली चित्रकलेला प्रोत्साहन देत आहेत. वारली कलेची प्रदर्शने आयोजित करण्याबरोबरच, कला ही स्वतःला व्यक्त करण्याचे आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्या समाजापर्यंत पोहोचवत आहेत.

महिलांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने त्या मैत्रिणींसह ‘तूचि दुर्गा तू भवानी’ हा WhatsApp समूह चालवतात. प्रेरणादायी संदेश आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

लेखन आणि कविता ही त्यांची आणखी एक जिव्हाळ्याची आवड. विचार, भावना, अनुभव आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शब्दांतून व्यक्त करण्याला त्या विशेष महत्त्व देतात.

HR क्षेत्रातील अनुभवातून माणसांना समजून घेण्याची दृष्टी, समुपदेशनातून आलेली संवेदनशीलता, कलेतील सर्जनशीलता आणि लेखनातून विचार मांडण्याची क्षमता यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.

सकारात्मक विचार, सर्जनशील अभिव्यक्ती आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे निबंधातील विचारांची खोली, संवेदनशीलता, मांडणी आणि सामाजिक दृष्टिकोन यांचे चिकित्सक परीक्षण करण्यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच मोलाचा ठरेल.
सौ. साक्षी अमोल केरकर

सौ. साक्षी अमोल केरकर

Graphologist & Signature Analyst | Educator & Child Development Trainer | Entrepreneur
साक्षी अमोल केरकर या हेल्थकेअर आणि हॉस्पिटल क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अनुभवी उद्योजिका आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवासोबतच शिक्षण, बालविकास, व्यक्तिमत्त्व विकास, सर्जनशील कला आणि सार्वजनिक संवाद अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

त्या International Council of Graphologists शी संलग्न असून त्यांच्या पॅनेलवर ग्राफोलॉजिस्ट आणि सिग्नेचर अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. हस्ताक्षर आणि स्वाक्षरीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू समजून घेण्याच्या क्षेत्रात त्यांना विशेष अनुभव आहे. याशिवाय त्या Reiki Grand Master Healer, Wrist Watch Analyst आणि Mobile Numerologist म्हणूनही कार्यरत आहेत.

शिक्षण आणि बालविकास हा त्यांच्या कार्याचा विशेष आवडीचा भाग आहे. विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती, गणितातील कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्या Handwriting Improvement, Memory Techniques तसेच Basic आणि Advanced Maths Techniques यांचे ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण देतात.

बालसंस्कार क्षेत्रातही त्या सक्रिय असून ब्रेन गेम्स, ब्रेन एक्सरसाइजेस, श्लोक-मंत्र पठण, शैक्षणिक उपक्रम आणि संस्कारमूल्यांवर आधारित विविध सत्रांद्वारे मुलांच्या बौद्धिक, मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगदान देत आहेत. प्रत्येक मुलामधील सुप्त क्षमता ओळखून ती विकसित करण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

शिक्षण आणि व्यवसायासोबतच अभिनय आणि सूत्रसंचालन या सर्जनशील क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सन २०१७ पासून त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत असून विविध टेलिव्हिजन मालिका, वेब सिरीज, चित्रपट आणि रंगभूमीवरील नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना त्यांनी प्रभावी संवादकौशल्य आणि प्रेक्षकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

सतत शिकत राहणे, स्वतःचा विकास करणे आणि आपल्या ज्ञान व अनुभवाच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शिक्षण, बालविकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रातील त्यांची आस्था, विविधांगी अनुभव आणि संवेदनशील दृष्टिकोन त्यांना एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून विशेष ओळख देतात.

Work Experience
Marathi Film
1.Samarth Yogi

Hindi web Series
1. The Service Girl
2. L lag gaye

Marathi Serial
1. Sath de tu mala
2. Baapmanus
3. ⁠vartool
4. ⁠Crime Time
5. ⁠Bhogo Mohan pyaare
6. ⁠Ghetla vasa taku nako

Marathi Drama
1. The last mistake

Short Marathi film
1.The Clay
2.Happiness
3.Ladies Special
4 The End

निबंध स्पर्धेच्या परीक्षक म्हणून

विविध क्षेत्रांतील त्यांचा अनुभव आणि विचार समजून घेण्याची, त्यातील बारकावे ओळखण्याची तसेच प्रभावी अभिव्यक्तीचे मूल्यमापन करण्याची क्षमता निबंध परीक्षणासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. विशेषतः विषयाची समज, विचारांची स्पष्टता, सर्जनशीलता, मांडणी, भाषिक अभिव्यक्ती आणि विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या बाबींचे परीक्षण करण्यासाठी त्यांचा बहुआयामी अनुभव महत्त्वपूर्ण ठरेल.
श्री. विस्मय कासार

श्री. विस्मय कासार

मराठी रंगभूमीवरील अभिनेता | नाट्यलेखक | रंगकर्मी
विस्मय कासार हे सन २०१९ पासून मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेले अभिनेता, नाट्यलेखक आणि रंगकर्मी आहेत. अभिनयासोबतच नाट्यलेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. व्यावसायिक तसेच प्रायोगिक रंगभूमीवरील विविध प्रकारच्या नाट्यप्रयोगांमध्ये काम करताना त्यांना अभिनय, लेखन आणि रंगमंचीय सादरीकरणाचा समृद्ध अनुभव प्राप्त झाला आहे.

रंगभूमीवरील त्यांच्या अभिनयप्रवासात ‘डावपेच’, ‘आनंदी आनंद’, ‘भुताचं लग्न’, ‘राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान’, ‘एक नातं असंही’ आणि ‘स्वामींची शाळा’ यांसारख्या विविध नाटकांचा समावेश आहे. तसेच ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘प्रेमास रंग यावे’ या मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला आहे. ‘गमन’ या मराठी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे.

अभिनयासोबतच नाट्यलेखन हा त्यांच्या कलाप्रवासातील महत्त्वाचा पैलू आहे. ‘एक नातं असंही’, ‘भाषा अंतर’ आणि ‘स्वामींची शाळा’ या नाटकांच्या लेखनातून त्यांनी सामाजिक, भावनिक आणि वैचारिक विषयांना रंगभूमीवर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखनातून केवळ मनोरंजन नव्हे, तर माणूस, नाती, समाज आणि आपल्या आजूबाजूच्या वास्तवाकडे संवेदनशीलतेने पाहण्याचा दृष्टिकोन जाणवतो.

विस्मय कासार यांच्या रंगभूमीवरील अनुभवाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सामाजिक जाणिवा आणि समाजाप्रती असलेले दायित्व. कला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजाशी संवाद साधण्याचे, प्रश्न उपस्थित करण्याचे आणि सकारात्मक विचारांना दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे, या दृष्टिकोनातून त्यांच्या कलात्मक प्रवासाकडे पाहता येते. समाजातील विविध प्रश्न, मानवी नाती, मूल्ये आणि बदलत्या सामाजिक वास्तवाचे भान कलाकृतींमध्ये असणे आवश्यक आहे, हा विचार त्यांच्या नाट्यदृष्टीला अधिक व्यापक बनवतो.

अभिनेता म्हणून व्यक्तिरेखा साकारण्याचा, लेखक म्हणून विषयाची मांडणी करण्याचा आणि रंगकर्मी म्हणून संपूर्ण नाट्यप्रयोग समजून घेण्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे अभिनय, नाट्यलेखन, संवादफेक, व्यक्तिरेखा सादरीकरण, दिग्दर्शन, रंगमंचीय मांडणी आणि प्रेक्षकांवर होणारा एकूण परिणाम या विविध अंगांचा ते बारकाईने विचार करू शकतात.

निबंध स्पर्धेच्या परीक्षक म्हणून

निबंध हा केवळ भाषेचा किंवा शब्दांचा खेळ नसून लेखकाच्या विचारांची खोली, विषयाचे आकलन, सामाजिक भान, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्त करणारे माध्यम आहे. रंगभूमी आणि लेखन क्षेत्रातील अनुभवामुळे विस्मय कासार यांच्याकडे या विविध पैलूंकडे चिकित्सक आणि संवेदनशील नजरेने पाहण्याची क्षमता आहे.

विशेषतः विषयाची योग्य समज, स्वतंत्र विचार, सामाजिक जाणीव, समाजाप्रती असलेली जबाबदारी, विचारांची परिणामकारक मांडणी, सर्जनशीलता आणि वाचकांच्या मनावर उमटणारा प्रभाव या निकषांच्या दृष्टीने निबंधांचे परीक्षण करण्यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल.
डॉ. प्रदीप स. निंदेकर

डॉ. प्रदीप स. निंदेकर

Adviser, Udishta Foundation | Ph.D. in Social Work | सामाजिक विषयांवरील लेखक व पथनाट्यकर्मी | समाजकार्य अभ्यासक
डॉ. प्रदीप स. निंदेकर हे समाजकार्य, सामाजिक प्रबोधन, लेखन आणि नाट्यकलेच्या माध्यमातून जनजागृती या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेले समाजकार्य अभ्यासक आणि सामाजिक विषयांचे लेखक आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी समाजकार्याच्या क्षेत्रातील आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवत समाजकार्य विषयात Ph.D. पूर्ण केली आहे. सध्या ते Udishta Foundation चे Adviser म्हणूनही कार्यरत आहेत.

सन २००१ पासून समाजकार्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी पथनाट्य, एकपात्री प्रयोग, मार्गदर्शन आणि जनजागृतीपर कार्यशाळांच्या माध्यमातून सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले. समाजातील गंभीर प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता ते सामान्य माणसाला समजतील आणि त्यातून विचार व कृतीला चालना मिळेल, या उद्देशाने त्यांनी नाट्यकलेचा प्रभावी माध्यम म्हणून वापर केला.

त्यांच्या सामाजिक विषयांवरील पथनाट्यांमध्ये स्त्री सशक्तीकरण, स्वच्छता, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, अंधश्रद्धेचे परिणाम तसेच विविध सामाजिक प्रश्नांचा समावेश आहे. यासोबतच वृक्षारोपण आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.

सन २०११ ते २०१४ या कालावधीत कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात Livelihood Expert म्हणून काम करताना त्यांना ग्रामीण आणि तळागाळातील समाजाशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी गावपातळीवर काम करताना लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, उपजीविकेचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि स्थानिक पातळीवरील वास्तव जवळून समजून घेतले. या प्रत्यक्ष अनुभवामुळे त्यांच्या सामाजिक अभ्यासाला Ground Level Perspective प्राप्त झाला.

त्यांच्या शैक्षणिक अभ्यासातही सामाजिक वास्तवाशी निगडित विषयांना विशेष महत्त्व राहिले आहे. पदवी शिक्षणाच्या काळात त्यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाचा अभ्यास केला. पदव्युत्तर शिक्षणात नाथजोगी समाजाचे अध्ययन केले, तर Ph.D.च्या अभ्यासात व्यसनाधीनता, तिचे परिणाम आणि समाजकार्याच्या माध्यमातून होणारी मध्यस्थी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.

लेखनाच्या क्षेत्रातही डॉ. निंदेकर सातत्याने कार्यरत आहेत. सोशल मीडियाचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेचे परिणाम आणि विविध सामाजिक प्रश्न यांसारख्या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव आणि लेखनाची जाण यामुळे त्यांच्या विचारांना अभ्यासपूर्ण तसेच वास्तवाशी जोडलेली दिशा मिळते.

शासकीय सेवेत जबाबदारी सांभाळत असतानाही वेळेचा योग्य उपयोग करून सामाजिक आणि नाट्य क्षेत्रासाठी योगदान देणे, ही त्यांच्या कार्याची विशेष ओळख आहे. त्यांच्या मते, समाजकार्य हे केवळ नोकरी किंवा अभ्यासाचा विषय नसून समाजाप्रती असलेले दायित्व आणि जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कलागुणांचा उपयोग समाजातील प्रश्नांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी व्हावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

निबंध स्पर्धेच्या परीक्षक म्हणून

समाजकार्याचे शैक्षणिक ज्ञान, तळागाळातील प्रत्यक्ष अनुभव, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, लेखनाची जाण आणि नाट्यकलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रदीर्घ अनुभव ही डॉ. प्रदीप निंदेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

निबंधाचे परीक्षण करताना केवळ भाषेची सुंदरता किंवा लेखनशैली न पाहता विषयाचे आकलन, विचारांची खोली, सामाजिक जाणीव, वास्तवाचे भान, समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक जबाबदारी, सर्जनशीलता आणि सकारात्मक बदलाची दिशा यांचाही विचार करणे आवश्यक असते. या दृष्टीने त्यांचा अनुभव निबंध स्पर्धेच्या परीक्षणासाठी विशेष महत्त्वाचा ठरतो.

विशेषतः समाजातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणारा, वास्तव परिस्थिती समजून घेणारा आणि समाजासाठी सकारात्मक विचार मांडणारा लेख ओळखण्याची दृष्टी त्यांच्या सामाजिक अभ्यास आणि प्रत्यक्ष कार्यातून विकसित झाली आहे. त्यामुळे सहभागींच्या निबंधातील विचारांची प्रगल्भता, सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचे चिकित्सक व संवेदनशील मूल्यमापन करण्यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल.